राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान… महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या सर्व कलावंतांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन

नवी दिल्ली : 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे करण्यात आले. देशभरातील अनेक कलाकारांबरोबरच महाराष्ट्रातील कलाकारांनी या पुरस्कारांवर स्वतःचा ठसा उमटवला. महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या सर्व कलावंतांचे तसेच तंत्रज्ञांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आपल्या प्रतिभेने जगभरातील रसिकांचे मनोरंजन आणि प्रबोधन होवो तसेच आपणास मानाचे असे पुरस्कार सातत्याने मिळत राहोत, अशी सदिच्छा पाटील यांनी व्यक्त केली.
या मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .या सोहळ्यात मराठी चित्रपटांनी आपली गुणवत्ता आणि वैविध्य सिद्ध करत राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली. ‘शामची आई’, ‘नाळ २’ आणि ‘जिप्सी’ या चित्रपटांनी मराठी सिनेमाची श्रीमंती अधोरेखित करत विविध श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले. वर्ष २०२३ मधील उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांना सन्मानित करण्यात आले.
शामची आई’: साने गुरुजींच्या अजरामर साहित्यकृतीवर आधारित ‘शामची आई’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा रजत कमळ चा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार चित्रपटाचे निर्माते अमृता अरुण राव व दिग्दर्शक सुजय डहाके यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला.
‘नाळ 2’: 2018 च्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘नाळ’ चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘नाळ 2’ ने दुहेरी यश मिळवले. आटपाट प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज यांनी निर्मित, सुधाकर रेड्डी यक्कांती यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा सुवर्ण कमळ चा पुरस्कार मिळाला.
पुरस्कारार्थी:-
दादासाहेब फाळके पुरस्कार – अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मोहनलाल
महाराष्ट्रातील विजेते-
सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहरूख खान (जवान)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – विक्रांत मेस्सी (12th फेल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – राणी मुखर्जी (मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे)
संपूर्ण मनोरंजनात्मक चित्रपट – रॉकी और रानी की प्रेम कहानी, दिग्दर्शक – करण जोहर
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – श्यामची आई (अमृता फिल्मस्)
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट (दिग्दर्शक) – सुजय सुनील डहाके (श्यामची आई)
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट – नाळ 2 (सुधाकर रेड्डी यक्कांती)
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट (निर्माते) – झी एंटरटेनमेंट इंटरप्राईजेस लिमिटेड आणि आटपाट प्रोडक्शन (प्रतिनिधी – उमेश कुमार बंसल) (नाळ 2)
सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट (दिग्दर्शक) – आशिष अविनाश बेंडे (आत्मपॅम्फ्लेट)
सर्वोत्कृष्ट मेकअप – श्रीकांत जगन्नाथ देसाई (सॅम बहादूर)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सचिन अनंत लोवळेकर (सॅम बहादूर)
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार –
• त्रिशा विवेक ठोसर (नाळ 2)
• भार्गव जगताप (नाळ 2)
• श्रीनिवास पोकळे (नाळ 2)
• कबीर खंडारे (जिप्सी)