सांगली येथील श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय येथे इंग्रजी भाषा ग्रंथालय आणि कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

सांगली : सांगली येथील श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय येथे इंग्रजी भाषा ग्रंथालय आणि कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विद्यार्थिनींसोबत संवाद साधून पाटील यांनी नारीशक्तीला वंदन केले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, स्त्री ही आदिमायेचं स्वरूप असल्याने तिचा सन्मान करणे आपली जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी २०१४ पासून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यावर भर दिला, ज्यामुळे राज्यातील मुलींना व्यवसायिक शिक्षणाचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.
‘कमवा आणि शिका’ योजनेच्या माध्यमातून मुलींना शिक्षणासाठी लागणारा इतर खर्च भागवता येईल, तसेच कौशल्य आधारित युनिट उभारण्यासाठी संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा लताताई देशपांडे, उपाध्यक्षा स्मिता केळकर, यशस्वी आपटे, प्राचार्य अनिल सुकटे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.