मिरज येथील दि. मिरज एज्युकेशन सोसायटीच्या नूतन शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज येथील दि. मिरज एज्युकेशन सोसायटीच्या नूतन शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संस्थेच्या उपक्रमाला शुभेच्छा देताना पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत अग्रगण्य असून, आगामी काळात माँटेसरी स्तरावर कौशल्य आधारित शिक्षणाला विशेष महत्त्व राहणार आहे. शिक्षकांनी नवीन पिढी घडवताना प्रावीण्य असलेले विद्यार्थी घडवावेत, असा संदेश यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिला.
या कार्यक्रमास माजी मंत्री आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. सुरेश खाडे, सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, रा.स्व. संघाचे नितीन देशमाने, संस्थेचे अध्यक्ष संजय धामणगावकर, कार्याध्यक्ष चंद्रकांत देशपांडे, कार्यवाहक कविता चौथाई, मुख्याध्यापिका मंजिरी सोपल यांच्यासह सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.