नवरात्री निमित्ताने नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाभोंडल्याचे आयोजन… पाटील यांच्या हस्ते उपस्थित सर्व महिलांना साडी तसेच मुलींना बॅग वाटप

पुणे : भारतीय जनता पार्टी, देशप्रेमी मित्र मंडळ आणि मंदार बलकवडे मित्र परिवार यांच्या वतीने नवरात्री निमित्ताने महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाटील यांच्या हस्ते उपस्थित सर्व महिलांना साडी तसेच मुलींना बॅग वाटप करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती महिलांना देण्यात आली. यावेळी पाटील यांनी सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला देशप्रेमी मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला सभासद यांच्यासह सौ. मुग्धाताई भागवत, श्रीमती भारती बलकवडे, भाजपा प्रभाग अध्यक्ष ॲड. प्राचीताई बगाटे, उपाध्यक्ष अनघाताई जगताप, अपर्णाताई लोणारे तसेच एरंडवणे भागातील महिला व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.