मंदिरे ही फक्त श्रद्धेची नव्हे तर सामाजिक सेवेची केंद्रे, त्यामुळे अशा सभागृहांचे निर्माण समाजजीवनासाठी अत्यंत महत्वाचे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर आणि श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) सांगली शाखेच्या पारायण सभागृहाचे काम सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून करण्यात आले असून, गुरुवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले.
मंदिरे ही फक्त श्रद्धेची नव्हे तर सामाजिक सेवेची केंद्रे आहेत. त्यामुळे अशा सभागृहांचे निर्माण समाजजीवनासाठी अत्यंत महत्वाचे असल्याची भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रकाश ढंग, पृथ्वीराज भैय्या पवार, सुनील माने, अशोक पाटील, पद्माकर जगदाळे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.