नामदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील विविध नवरात्रौत्सव मंडळांमध्ये स्थापित देवींचे दर्शन घेऊन मनोभावे केली पूजा

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कोथरुड मतदारसंघातील विविध नवरात्रौत्सव मंडळांमध्ये स्थापित देवींचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. कोथरुडकरांचे श्रद्धास्थान श्री वनदेवी मंदिरास देखील त्यांनी भेट दिली.
चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील विविध नवरात्रौत्सव मंडळांमध्ये स्थापित देवींचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, सर्व भाविकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवो, अशी प्रार्थना करत सर्व भाविकांना नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. भीमराव तापकीर, कोथरुड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वत्र शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात साजरा होत आहे. याच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडकरांचे श्रद्धास्थान श्री वनदेवी मंदिरास देखील भेट देऊन आईचे दर्शन घेतले. सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी देवी चरणी प्रार्थना केली. तसेच, आईच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या!