सरस्वती गारमेंट्सच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

128

कोल्हापूर : अल्पावधीतच भुदरगड तालुक्यातील शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या खानापूर येथील सरस्वती गारमेंटच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन रविवार महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील यांच्या हस्ते सपन्न झाले. भुदरगड नगरीत मंत्री चंद्रकांत पाटील येताच त्याचे स्वागत भुदरगड राधानगरी आजरा तालुक्याचे प्रांत हरीश सूळ यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती गारमेंटच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संयोजिका तथा सरस्वती गारमेंट्स च्या अध्यक्षा माजी सरपंच सौ.विद्या प्रवीणसिंह सावंत यांनी खानापूर येथे पहिली शाखा सुरू करून सरस्वती गारमेंटच्या माध्यमातून शेकडो महिलांना खानापूर सारख्या ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले आहे. तालुक्यातील आणखीनही महिलां कडून सातत्याने रोजगाराची मागणी होत होती याचा विचार करून दुसरी शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी मंत्री पाटील यांनी संपूर्ण गारमेंटची पाहणी करत नवीन गारमेंटची माहिती घेतली व आपल्या परीने होईल तेवढे सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी सर्व महिलांना दिले. यावेळी सर्व महिलांच्या वतीने त्यांचे औक्षण करून पेढे भरवण्यात आले. त्यानंतर अशोका हॉल खानापूर येथे सरस्वती गारमेंटच्या माध्यमातून गणेशउत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये सहभागी झालेल्या खानापूर, कलनाकवाडी, गारगोटी येथील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्याना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर नवरात्र उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध विनोदी भारुडकार  महादेव महाराज शेंडगे यांचा देवीच्या भारुड गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी देवीच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलाने करण्यात आले.

अल्पावधीतच शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या सरस्वती गारमेंट खानापूर शाखेला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला नवनवीन कंपन्याचा शोध घेऊन महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करूया असे प्रतिपादन पाटील यांनी केले.

पाटील म्हणाले की, महिला सक्षम झाल्या तरच कुटूंब व्यवस्था सक्षम होईल त्यादृष्टीने आपले प्रयत्न असुन सौ.विद्या सावंत या खरोखरच प्रामाणिक पणे त्यामध्ये कार्यरत आहेत त्यांना पाठबळ देवूया.

राज्य वाहतूक आघाडीचे उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंत म्हणाले की, सरस्वती गारमेंट्स सेंटर ची पहीली शाखा अत्यंत उत्तमरित्या चालली असुन नवीन शाखेत अद्यावत मशिनरी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजरा-भुदरगडचे प्रांताधिकारी हरीश सुळ हे होते तर सुत्रसंचलन आनंद चव्हाण यांनी केले या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र राज्य वाहतूक आघाडीचे उपाध्यक्ष प्रवीण सिंह सावंत, सौ. विद्या सावंत, देवराज बारदेसकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष नामदेव चौगुले, बाजार समितीचे माजी अध्यक्ष बी डी भोपळे, राजेंद्र पाटील, सुभाष पाटील, बाजीराव देसाई, सुशांत मगदुम,बिद्री चे माजी संचालक विठ्ठलराव खोराटे, बाळासाहेब भोपळे, संजय रेडेकर, दत्तात्रय चव्हाण,संजय चिले, सुशांत मगदूम, सागर नाईक, स्वप्नील मांगले, सचिन पाटील यां सह तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार युवक नेते पार्थ प्रवीणसिंह सावंत यांनी मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.