मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवरात्सौवानिमित्त सीरवी समाजाच्यावतीने कोथरुडमधील श्री आई माताजी मंदिरात जाऊन आईच्या चरणी सर्वांच्या कल्याणासाठी केली प्रार्थना

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या कोथरूड मतदारसंघातील श्री आई माताजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यासोबतच नवरात्सौवानिमित्त कोथरुड मतदारसंघातील रहिवासी तथा पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ संदीप बुटाला यांच्या घरी भेट देऊन बुटाला कुटुंबियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
सध्या सर्वत्र आदिशक्तीचा जागर सुरु आहे. नवरात्सौवानिमित्त सीरवी समाजाच्यावतीने कोथरुडमधील श्री आई माताजी मंदिरात आईचा जागर करण्यात येत आहे. चंद्रकांत पाटील यांनी या मंदिरात जाऊन आईच्या चरणी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली, आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. समाजाच्या वतीने मंदिर परिसरास संरक्षक भिंत बांधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. या मध्ये खारीचा वाटा उचलत मंदिरास संरक्षक भिंत बांधून दिली. आज त्या भिंतीचे लोकार्पण देखील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
नवरात्सौवानिमित्त पाटील यांनी त्यांच्या कोथरुड मतदारसंघातील रहिवासी तथा पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ संदीप बुटाला यांच्या घरी भेट देऊन बुटाला कुटुंबियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. आदिशक्तीची कृपा सदैव बुटाला कुटुंबियांवर राहो, अशी सदिच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केली.