उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक संपन्न

18

मुंबई : मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली.

या बैठकीत सेवा अटी, वेतन, पदोन्नती, रजा रोखीकरण, निवृत्ती वयोमर्यादा यांसंबंधी सकारात्मक चर्चा झाली. तसेच समाजकार्य महाविद्यालये उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत आल्यानंतर प्रलंबित असलेल्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी पाटील यांनी दिले.

या बैठकीस उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे व प्रताप लुबाळ, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्सचे अध्यक्ष प्रा. डॉ. अंबादास मोहिते तसेच समाजकार्य महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.