मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या अडचणी व समस्यांची थेट घेतली माहिती

15

पुणे : प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणजे जनता दरबार! उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या अडचणी व समस्यांची थेट माहिती घेतली. नागरिकांनी मांडलेल्या विविध विषयांवर तात्काळ कार्यवाही होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी पाटील यांनी सूचना दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. आपल्या अनेक समस्या नागरिकांनी पाटील यांच्या समोर मांडल्या. नागरिकांनी मांडलेल्या विविध विषयांवर तात्काळ कार्यवाही होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी सर्व पाटील यांनी उपस्थित नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देखील दिल्या.

नृत्यांगना गौतमी पाटील अपघात प्रकरण

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी यावेळी मरगळे कुटुंबियांनी चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात भेट घेऊन मदतीची मागणी केली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी डीसीपी संभाजी पाटील यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.