स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढवणार असलो तरी, या निवडणुकांमध्ये भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही – मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भाने भारतीय जनता पार्टी कोल्हापूरचा “विजय संकल्प मेळावा” कुर, तालुका भुदरगड येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढवणार असलो तरी, या निवडणुकांमध्ये भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडली. भाजपाच्या कोल्हापूर जिल्हा पश्चिम विभागाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे यावेळी वाटप करण्यात आले .
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, माजी आमदार संजय बाबा घाडगे, के एस चौगुले, महेश जाधव, अंबरीश सिंह घाटगे, अशोक अण्णा चराटी, भगवानराव काटे, हंबीरराव पाटील, पी जी शिंदे, शिवाजी बुवा, अलकेश कांदळकर, संताजी घोरपडे, वसंतराव प्रभावळे, लहुजी जरग, मेजर भिकाजी जाधव, डॉक्टर आनंद गुरव, सुशीला पाटील, महेश चौगुले, हेमंत कोलेकर, राजेंद्र तारळे, सुधीर कुंभार, अरुण देसाई, संदीप नाथ बुवा, संभाजी आरडे, तानाजी कुरणे, सचिन बल्लाळ, व्ही टी जाधव, विलास बेलेकर, रवींद्र कामत, राजेंद्र ठाकूर, भुदरगड तालुका अध्यक्ष संतोष पाटील, रणजीत मुडूकशिवाले, रवीश पाटील कौलवकर, रेखा नांगरे पाटील, धीरज करलकर, मेघा राणी जाधव, नामदेव कांबळे, पांडुरंग वायदंडे, भगवान शिंदे, पंडित पाटील, मोहन सूर्यवंशी, सुनील तेली, रणजीत आडके, अमोल पाटील, अजित सिंह चव्हाण, डॉ .सुभाष जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वप्निल सुपल यांनी केले .