MAI संस्थेच्या वतीने प्रकाशित विशेष अंकाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे : MAI ( Mission Arthritis India) आणि Center for Rheumatic Diseases यांच्या वतीने २५ व्या जागतिक संधिवात दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. MAI संस्थेच्या वतीने प्रकाशित विशेष अंकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
संधिवात हा एक जुनाट आजार आहे. त्यामुळे स्नायूंवर अतिशय गंभीर परिणाम होतात. त्यामुळे यावर काळजी घेणे हे आवश्यक आहे. आज प्रकाशित अंकामध्ये संधिवाताची लक्षणे आणि त्यावर घ्यावयाची काळजी याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर लेख असल्याने पीडित रुग्णांना हा अंक अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी संस्थेच्या विश्वस्त शरयू भट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.