पूज्य गुरुदेव श्री.श्री रविशंकर जी यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आणि श्री.श्री विद्यापीठ यांच्या दरम्यान शैक्षणिक सामंजस्य आणि भागीदारी संदर्भात ऐतिहासिक करार

11

पुणे : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पूज्य गुरुदेव श्री.श्री रविशंकर जी यांच्या उपस्थितीत 2 लाखाहून अधिक विद्यार्थीसंख्या असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आणि श्री.श्री विद्यापीठ यांच्या दरम्यान शैक्षणिक सामंजस्य आणि भागीदारी संदर्भात ऐतिहासिक करार करण्यात आला. या अंतर्गत द आर्ट ऑफ लिव्हिंग ट्रस्ट विद्यार्थ्यांसाठी संस्थात्मक उपक्रम राबवणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

यामुळे विद्यार्थी मानसिक आरोग्य आणि मानवी मूल्यांनी समृद्ध होतील. पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे लक्ष्य ठेऊन नव्या शैक्षणिक धोरणाची रचना केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आणि श्री.श्री विद्यापीठ यांच्या दरम्यान झालेला सामंजस्य करार, नव्या शैक्षणिक धोरणाला बळ देईल, असे मत पाटील यांनी व्यक्ते केले .

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. कारभारी काळे, श्री.श्री विद्यापीठाच्या अध्यक्षा प्रा. रजिता कुलकर्णी, संचालक स्वामी सत्य चैतन्य, आर्ट ऑफ लिव्हिंग ट्रस्टचे विश्वस्त श्री कृष्णाकुमार नायर, संचालक राजीव नंबीयार उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.