वनदेवी माता नवरात्र महोत्सव कमिटी, शितळादेवी नवरात्र महोत्सव कमिटी आणि आनंदीबाई कर्वे प्रतिष्ठानने कर्वेनगर येथे जत्रेचे आयोजन… नामदार चंद्रकांत पाटील यांनी जत्रेचा घेतला आनंद

पुणे : आपल्या महाराष्ट्रात जत्रेचे एक वेगळेच महत्व आहे. नवरात्रौत्सव आणि कोजागरी पौर्णिमेनिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील नागरिकांसाठी वनदेवी माता नवरात्र महोत्सव कमिटी, शितळादेवी नवरात्र महोत्सव कमिटी आणि आनंदीबाई कर्वे प्रतिष्ठानने कर्वेनगर येथे जत्रेचे आयोजन केले आहे. या जत्रेला रविवारी चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली आणि जत्रेचा आनंद घेतला.
या जत्रेचा प्रतिसाद पाहून अतिशय आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. यावेळी त्यांनी संयोजक रेश्मा बराटे आणि संतोष बराटे यांचे अभिनंदन करुन जत्रेला शुभेच्छा दिल्या. नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद यावेळी लाभला.