सेवा पंधरवड्यानिमित्त, योगेश बाचल यांच्या माध्यमातून “शिक्षकांचा सन्मान” कार्यक्रमाचे आयोजन… नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान

पुणे : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवड्यानिमित्त, योगेश बाचल यांच्या माध्यमातून “शिक्षकांचा सन्मान” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन शिक्षकांना सन्मानित केले आणि शिक्षकवृंदाला शुभेच्छा दिल्या.
समाजाच्या उन्नतीत शिक्षकवर्गाचे योगदान अमूल्य असल्याची भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, रविंद्र साळेगावकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.