सर जे. जे. कला महाविद्यालयाच्या परिसरात ऐतिहासिक आणि दुर्मिळ कलाकृती जतन करण्यासाठी स्वतंत्र आर्ट गॅलरी उभारण्याबाबत आढावा बैठक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

14

मुंबई : सर जे. जे. कला महाविद्यालयाच्या परिसरात ऐतिहासिक आणि दुर्मिळ कलाकृती जतन करण्यासाठी स्वतंत्र आर्ट गॅलरी (म्युझियम) उभारण्याबाबतचे सादरीकरण व आढावा बैठक मंत्रालय येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

या बैठकीत सर जे. जे. कला महाविद्यालयाच्या समृद्ध कलावैभवाचे जतन, संवर्धन आणि प्रदर्शनासाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त आर्ट गॅलरी उभारण्याच्या आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या गॅलरीत संस्थेतील ऐतिहासिक व दुर्मिळ कलाकृतींचे डिजिटल दस्तऐवजीकरण, विद्यार्थ्यांसाठी संशोधन व अभ्यासासाठी खुले प्रदर्शन विभाग, तसेच आधुनिक कलाप्रदर्शनासाठी स्वतंत्र दालन उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस राज्यमंत्री इंद्रनील नाईक, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य राजीव मिश्रा, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, सहसचिव संतोष खोरगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.