वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या प्रतिनिधींसोबत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

मुंबई : मंत्रालयात वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या प्रतिनिधींसोबत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुंबईत वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ स्थापन करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि राज्यात जागतिक दर्जाचे उच्च शिक्षण संस्थान उभारण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली, असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत, कौन्सल-जनरल ऑफ ऑस्ट्रेलिया यांच्यासह युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया प्रतिनिधी पॉल मर्फी, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे वाइसचांसलर प्रो.गाय लिटलफेअर, हेड ऑफ स्कूल फॉर अर्थ सायन्सेस आणि रिन्यूएबल एनर्जी, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रो.ॲनेट जॉर्ज,ग्लोबल ग्रोथ आणि अॅडव्होकेसी: प्रिन्सिपल लीड इंडिया, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया डायरेक्टर नशीद चौधरी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.