रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. स्नेहा रणजित कलाटे यांनी जेष्ठ नागरिकांसोबत साजरी केली कोजागिरी

पिंपरी – चिंचवड : नवरात्री नंतर येणारी पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. आजही कोजागिरीला तितकेच महत्व आहे. सर्वत्र या दिवशी जागरण करून दूध प्राशन केले जाते. रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. स्नेहा रणजित कलाटे यांनी यंदाची कोजागिरी अनोख्या पद्धतीने साजरी केली.
स्नेहा कलाटे यांनी जेष्ठ नागरिकांसोबत कोजागिरी साजरी केली. छान गप्पा गोष्टींचा आणि अल्पोपहाराचा छोटेखानी कार्यक्रम त्यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केला होता. यावेळी अनेक जेष्ठ नागरिकांनी गाण्याचा देखील आनंद घेतला. रोजच्या जीवनातून सर्वांसोबत आनंदाचे हे क्षण सर्वांसाठीच नवचैतन्य देणारे आणि ऋणानुबंध जपणारे आहेत.
माझ्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात जेष्ठ नागरिक आणि वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन मला लाभले हे माझे भाग्य आहे, असे मत यावेळी स्नेहा कलाटे यांनी व्यक्त केले. यावेळी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ मार्गदर्शक यांचे त्यांनी आभार मानले.