सरकार कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत संवेदनशील असून चर्चेद्वारे समाधानकारक तोडगा निघेल – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : मुंबई विद्यापीठातील १९८५ ते १९९५ या कालावधीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात पुढील बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती दिली.
सरकार कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत संवेदनशील असून चर्चेद्वारे समाधानकारक तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त यावेळी पाटील यांनी केला. तसेच, सुरु असलेले आंदोलन मागे घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
बैठकीस मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.