सातारा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या नव्या पुस्तकपेढीचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

सातारा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे गुरुवारी सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सातारा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाला सदिच्छा भेट देत वाचनालयाच्या नव्या पुस्तकपेढीचे लोकार्पण केले.
नगर वाचनालयाच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली. त्यामुळे सर्व नवनिर्वाचित विश्वस्तांचे चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले तसेच वाचनालयाची शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरु असल्याने, यापुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, उपाध्यक्ष अतुल दोशी, विश्वस्त समिती अध्यक्ष अनंतराव जोशी, संचालक संदीप श्रोत्री यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य आणि वाचक उपस्थित होते.