पुणे महापालिकेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित बचत महोत्सवाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट

पुणे : पुणे महापालिकेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित बचत महोत्सवाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी होत असलेल्या उपक्रमाचे अभिनंदन केले तसेच सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी ‘वोकल फॉर लोकल’ चा मंत्र अंगीकारत जास्तीत जास्त खरेदी करावी, असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले.
या प्रसंगी कोथरुड भाजपा मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, महिला मोर्चा अध्यक्षा हर्षाली माथवड, प्रभाग अध्यक्ष अतुल शिंदे, विद्याताई टेमकर, सुचित देशपांडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.