माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेच्या समाजपरिवर्तनाच्या वाटचालीचा मागोवा घेणारे ‘देवराई’ हे पुस्तक तसेच ‘दिदी परिवर्तनाची’ ही चित्रफीत यांचे प्रकाशन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

पुणे : ग्रामीण भागातील महिला आणि मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला या संस्थेच्या कार्यप्रवासाचे दर्शन घडवणारे दोन महत्त्वाचे उपक्रम रविवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साकार झाले. संस्थेच्या समाजपरिवर्तनाच्या वाटचालीचा मागोवा घेणारे ‘देवराई’ हे पुस्तक (लेखिका – सौ. मृधा फडके) तसेच संस्थेच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास मांडणारी ‘दिदी परिवर्तनाची’ ही चित्रफीत यांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानशी पूर्वीपासूनच असलेले माझे आत्मीय नाते अधिक दृढ होत आहे. संस्थेच्या कार्याला पाटील यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या!
यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. संजीवनी केळकर, प्रा. निलिमा कुलकर्णी, खजिनदार डॉ. शालिनी कुलकर्णी, सचिव सौ. वसुंधरा कुलकर्णी तसेच संस्थेशी संलग्न मान्यवर उपस्थित होते.