उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या विविध प्रश्नांवर आढावा बैठक संपन्न

8

मुंबई : मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय व विकासात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

विद्यार्थ्यांना दर्जेदार, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी आवश्यक त्या सुधारणा व उपाययोजना राबविण्याचे निर्देश यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी ठोस योजना आखण्याचेही आवाहन यावेळी त्यांनी केले.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव श्री. प्रताप लुबाळ, कुलगुरू प्रा. सजीव सोनवणे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.