भारतीय जनता पार्टी आष्टा मंडल जनसंपर्क कार्यालय हे जनसेवेचे प्रमुख केंद्र ठरावे आणि स्थानिक कार्यकर्त्यांना नवउमेद देणारे ठिकाण व्हावे – मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : उरूण ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी आष्टा मंडल जनसंपर्क कार्यालय उद्घाटन समारंभ, नूतन मंडल पदाधिकारी निवड, पक्ष प्रवेश कार्यक्रम आणि कार्यकर्ता संवाद मेळावा हा भव्य कार्यक्रम राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हे कार्यालय जनसेवेचे प्रमुख केंद्र ठरावे आणि स्थानिक कार्यकर्त्यांना नवउमेद देणारे ठिकाण व्हावे, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यालयातून पक्षाच्या विचारधारेचा प्रसार आणि लोकहिताचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.