कोहिनूर शिक्षण संस्था संचलित, खुलताबाद यांच्या शैक्षणिक कामकाजासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक संपन्न

मुंबई : कोहिनूर शिक्षण संस्था संचलित, खुलताबाद (जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्या शैक्षणिक कामकाजासंदर्भात मंत्रालय, मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत विद्यार्थ्यांना दर्जेदार, सुलभ आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी केल्या.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.