महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेची ४४ वी बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेची ४४ वी बैठक मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली.
बैठकीत तंत्र शिक्षणाच्या दर्जा उन्नतीसाठी तसेच अभ्यासक्रम, परीक्षा प्रणाली आणि उद्योग-शिक्षण यातील समन्वय वाढविण्यासंबंधी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण पद्धती अंगीकारण्यावर भर देण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत दिले.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, नियामक परिषदेचे सदस्य भरत अंमळकर तसेच इतर सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.