नामदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून कोथरूडकरांची दिवाळी गोड… नाममात्र दरात फराळ उपलब्ध उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : प्रतिवर्षीप्रमाणे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम यंदाही सुरू करण्यात आला आहे. पाषाण आणि सुतारवाडी भागानंतर बुधवारी कोथरुड परिसरातील नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली कि, यंदा कसबा आणि शिवाजीनगर भागातील नागरिकांनाही या उपक्रमाचा लाभ घेता आला असून, त्यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. दिवाळीच्या आनंदसोहळ्यात सहभागी होत, कोथरुडकरांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्याचा हा प्रयत्न नागरिकांकडूनही उत्साहाने स्वीकारला गेला आहे. कोथरुडकरांच्या आनंदात आमचे समाधान असल्याचे पाटील यांनी म्हटले.
कोथरुड मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीची दिवाळी गोड व्हावी; या उद्देशाने दरवर्षी नामदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून देतात. पाटील यांच्या या उपक्रमामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिवाळी मध्ये मोठा आधार मिळातो. अनेकजण याचा लाभ घेत दिवाळी फराळाचा आस्वाद घेतात. यंदाही चंद्रकांत पाटील यांनी दिवाळीसाठी बाणेर, कोथरुड आणि कसबा मधील नागरिकांसाठी नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला. पाटील यांच्या माध्यमातून जवळपास १५ हजार किलोपेक्षा जास्त दिवाळी फराळ उपलब्ध करून देण्यात येतो.