दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय ज्ञानप्रणाली आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी जडण-घडण हा दिवाळी अंक अतिशय उपयुक्त – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे येथे आज सह्याद्री प्रकाशनच्या जडण-घडण मासिकाच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
भारताची वैभवशाली ज्ञानपरंपरा ही वसुधैव कुटुंबकमचा पुरस्कार करणारी असल्याचे मत याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय ज्ञानप्रणाली आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी हा दिवाळी अंक अतिशय उपयुक्त ठरेल, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
यावेळी युनायटेड नेशन्स मधील संशोधक डॉ. राजेंद्र शेंडे, प्रसिद्ध शास्त्रीय गायक शौनक अभिषेकी, जडण-घडण मासिकाचे मुख्य संपादक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे, सह्याद्री प्रकाशनाच्या संपादक सौ. स्मिता देशपांडे, तसेच श्रीकांत देव आदी उपस्थित होते.