‘पुस्तक वारी’ म्हणजे पुणेकर वाचनप्रेमींसाठी दिवाळीची खास भेटच – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणजे पुणे. अनेक ठिकाणांहून विद्यार्थी हे पुण्यात शिक्षणासाठी येतात. त्यामुळं येथे वाचनप्रेमींची संख्या देखील अधिक आहे. वाचनप्रेमी पुणेकरांसाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून ‘पुस्तक वारी’ या उपक्रमाचा गुरुवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी आणि ज्ञानयात्रा अधिक व्यापक करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल. ही ‘पुस्तक वारी’ म्हणजे पुणेकर वाचनप्रेमींसाठी दिवाळीची खास भेटच आहे, अशी भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे निदेशक कर्नल युवराज मलिक, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि पुस्तकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.