नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मानसी प्रकल्पाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन संपन्न

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधील लेकींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सुरु केलेल्या “मानसी” प्रकल्पाचा विस्तार आता विविध वस्त्यांमध्ये यशस्वीपणे होत आहे. यामुळे कार्यन्वयन आणि समन्वयासाठी मध्यवर्ती कार्यालयाची आवश्यकता भासली. आज वसुबारसच्या शुभ मुहूर्तावर चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधील लेकींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सुरु केलेल्या “मानसी” प्रकल्पाला महिला भगिनींचा चांगलाच प्रतिसाद लाभत आहे. याचा विस्तार आता विविध वस्त्यांमध्ये यशस्वीपणे होत आहे. योग, वेळोवेळी आरोग्य तपासणी, पोषक आहार आणि समुपदेशन यामुळे मुलींच्या व्यक्तिमत्वात नवा आत्मविश्वास आणि सुधारणा दिसून येत आहे. यामुळे कार्यन्वयन आणि समन्वयासाठी मध्यवर्ती कार्यालयाची आवश्यकता भासत असल्याचे पाटील यांनी म्हटले. आज या कार्यालयाचे उदघाटन करून पाटील यांनी उपस्थित सर्व माता-भगिनींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी मोनिका वहिनी मोहोळ यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.