उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या खात्याशी संबंधित विविध विकास कामांसंदर्भात आढावा बैठक संपन्न

पुणे : पुणे येथे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या सूचनेनुसार पुणे महानगरपालिकेच्या खात्याशी संबंधित विविध विकास कामांसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत आगामी काळात पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेसाठी रस्ते विकासाचा सर्वंकष आराखडा तयार करून दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करावी, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले आणि विविध विधानसभा मतदारसंघातील खड्डे बुजविल्याचा अहवाल सर्व आमदारांनी नियमितपणे उपलब्ध करून द्यावा, अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.
यावेळी आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंतजी रासने, बापूसाहेब पठारे, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.