नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, भाजपा कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर यांच्या माध्यमातून दीपावलीच्या निमित्ताने आयोजित “सूरसंध्या” कार्यक्रम उत्साहात संपन्न
पुणे : भाजपा कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर यांच्या माध्यमातून दीपावलीच्या निमित्ताने “सूरसंध्या” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्वांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या, तसेच आयोजकांचे कौतुक देखील केले.

“सुरसंध्या” या दिवाळी विशेष कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात श्री. नामदेव दातार (पत्रकारिता), श्री. शिवकुमार पांडे, (धार्मिक क्षेत्र), श्री. प्रकाश बोकील उंबरगे (सामाजिक क्षेत्र), श्री. किशोर वैद्य,(सामाजिक क्षेत्र), कुमार. आरव पटवर्धन (क्रीडा क्षेत्र) यांना चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
समाजासाठी मनापासून काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणं, त्यांच्या प्रयत्नांचा गौरव करणं हाच लहू बालवडकर सोशल वेलफेअरचा हेतू आहे. या कार्यक्रमातून समाजातील कार्यकर्त्यांना मिळालेला सन्मान म्हणजे त्यांच्या योगदानाला मिळालेली खरी दाद आहे, त्यांना पुढील वाटचालीसाठीची प्रेरणा आहे. बाणेर-बालेवाडी, सुस, महाळुंगे, पाषाण, सोमेश्वरवाडी आणि सुतारवाडी परिसरातील नागरिकांसाठी समाजहिताचं कार्य नेहमीच घडत राहो आणि त्यांचा सन्मान आम्ही दरवर्षी करत राहो, अशा भावना यावेळी हू बालवडकर यांनी व्यक्त केल्या.