संकल्प सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयोजनातून नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवाळी फराळ स्नेहमेळावा आणि सांगीतिक मैफिलीचे आयोजन
पुणे : कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर-एरंडवणे-वारजे भागातील नागरिकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी संकल्प सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयोजनातून दिवाळी फराळ स्नेहमेळावा आणि सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रसिद्ध गायक पराग माटेगावकर आणि त्यांच्या टीमने सादर केलेल्या सुरेल गाण्यांनी उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. ही सांगीतिक मेजवानी अनुभवण्याचा अतिशय आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक सुशील मेंगडे, शिवरामपंत मेंगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.