अथर्व युनिव्हर्सिटी, मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली सदिच्छा भेट

13

मुंबई : अथर्व युनिव्हर्सिटी, मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यापीठाच्या “Project Friday” या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सादर केलेले तंत्रज्ञानाधारित आणि अभिनव प्रकल्प पाहिले. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, कल्पकता आणि संशोधनात्मक दृष्टिकोन यांचे यावेळी पाटील यांनी मनःपूर्वक कौतुक केले. तसेच Robotics Centre आणि AR/VR Lab ला भेट देऊन कॅम्पसमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना उद्योगमान्य कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले. अशा उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम, नाविन्यपूर्ण आणि आधुनिक दिशेने वाटचाल करत असल्याचे मत व्यक्त केले.

या प्रसंगी अथर्व युनिव्हर्सिटीचे पहिले कुलपती, माजी आमदार सुनील राणे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.