नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपावलीच्या औचित्याने भाजपा नेते मंदार बलकवडे यांच्या माध्यमातून विशेष कार्यक्रमाचे आयोजन

5

पुणे : दीपावलीच्या औचित्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील भाजपा नेते मंदार बलकवडे यांच्या माध्यमातून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्व माता-भगिनींना दिवाळी आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

स्नेह, प्रेम आणि आपुलकीचे नाते दृढ करणारा हा सण आनंद आणि उत्साहाने साजरा करण्यात आला.  खिलारेवाडी,गावठाण,भालेकर चाळ, रजपुत वीटभट्टी,ढेरे चाळ,कवडे प्लॉट, प्लॉट नं१४ व १५ येथील स्थानिक महिला भगिनींसोबत स्नेह, प्रेम आणि आपुलकीचे नाते दृढ करणारा हा भाऊबीजेचा सण आनंद आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी पाटील व भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांना उपस्थित महिलांनी औक्षण केले, चंद्रकांत दादा व धीरज घाटे यांच्या शुभहस्ते उपस्थित सर्व महिला भगिनींना साडी भेट देण्यात आली.

यावेळी भाजपा कोथरूड मंडल सरचिटणीस गायत्रीताई लांडे, कुणाल तोंडे, शंतणू खिलारे, शिवाजी शेळके, श्रीकांत गावडे, अमोल डांगे, वैभव जमडादे, गजानन माझिरे, चेतन धाडवे, गणेश थरकुडे,संतो ष लांडे,सौ.सुलभाताई जगताप,सौ.संगिताताई शेवडे, अविनाश बलकवडे, विनय सुभेदार,अभिषेक दळवी,वैभव धापसे,प्रणव गरूडकर,अनुज मुळीक,साजिद तांबोळी,सुदर्शन मोतीवाले,ऋषिकेश देव्हडे,रोहन ढमाले,रोहित सुतार,अतुल सणस, सुधाकर राऊत,सागर सुतार,रोहित बलकवडे यांच्या सह भाजपा व देशप्रेमी मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.