पुणे शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात केला जाहीर प्रवेश
पुणे : पुणे शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे चंद्रकांत पाटील यांनी पक्षात मनःपूर्वक स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

भाजपाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षात दाखल झालेल्या या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार भीमराव आण्णा तापकीर, गणेश बिडकर, पुनीत जोशी, लहू बालवडकर तसेच भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.