नानांनी आयुष्यभर भगवंताचे नामस्मरण, कीर्तन व समाजसेवेत आपले जीवन व्यतीत केले, या महान संतपुरुषांच्या कार्यास व सेवाभावास साष्टांग दंडवत – नामदार चंद्रकांत पाटील
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील ह.भ.प. बबनराव वेवले यांच्या शताब्दीपूर्ती निमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी सहभागी होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, नानांनी आयुष्यभर भगवंताचे नामस्मरण, कीर्तन व समाजसेवेत आपले जीवन व्यतीत केले. या महान संतपुरुषांच्या कार्यास व सेवाभावास साष्टांग दंडवत. या सोहळ्याच्या निमित्ताने एक आगळी अध्यात्मिक अनुभूती आली, असल्याचे पाटील यांनी म्हटले.
नानांना उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.