कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश… भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत
मुंबई : सातारा, कोल्हापूर, लातूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. कराडच्या माजी नगराध्यक्षा आणि नगरसेविका शारदा जाधव, कराड जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अरुण जाधव, कोल्हापूरचे दंत चिकित्सक डॉ. विजयसिंह गायकवाड यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला , जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते आ. डॉ. विजयकुमार गावीत, आ. डॉ.अतुलबाबा भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, आ. मनोज घोरपडे, लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, लातूर जिल्हा प्रभारी किरण पाटील, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, माजी आमदार वैभव पिचड आदी उपस्थित होते.
आ. अतुलबाबा भोसले यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे कराडमधील प्रवेश शक्य झाल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. कराड आणि मलकापूर या दोन्ही नगर परिषदा भाजपाच्या ताब्यात येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नंदुरबारच्या माजी खासदार डॉ. हीना गावीत यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आल्याचे पत्र यावेळी त्यांना देण्यात आले. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे माजी आमदार बब्रुवान खंदाडे, गणेश हाके, ज्ञानोबा बडगीरे, डॉ. सिध्दार्थकुमार सुर्यवंशी यांच्यावरील निलंबन कारवाई रद्द केल्याचे पत्रही यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ‘सबका साथ सबका विकास’ या धोरणानुसार समाजातील सर्व घटकांची उन्नती वेगाने होत आहे. या दोघांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवत जनतेशी नाळ जुळलेल्या मातब्बर नेत्यांचा तसेच युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. राष्ट्रहिताच्या कार्यात आपलेही योगदान असावे या हेतूने अनेकांचा ओढा भाजपाकडे वाढत आहे. त्यांच्या साथीने पक्षाची ताकद वाढेल असे चव्हाण म्हणाले.
लातूर मनपाचे माजी सभापती गिरीश पाटील, माजी नगरसेवक गौरव काथवटे, धाराशीव जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, उमरगा पं. स. माजी सभापती अक्षरा सोनवणे, हिंदू खाटीक महासंघाचे माजी अध्यक्ष जयंतराव काथवटे, औसाचे माजी नगराध्यक्ष मंथन मिटकरी यांनी काँग्रेसमधून भाजपा मध्ये प्रवेश केला.
भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये कराडचे माजी नगराध्यक्ष अशोक भोसले, माजी नगरसेवक आनंद पालकर, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय शिवाजी पवार, माजी नगरसेविका चंदाराणी पवार, जनशक्ति आघाडीचे उपाध्यक्ष अतुल शिंदे, स्व. जयंत जाधव यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष डॉ. आशुतोष जाधव यांचा समावेश आहे.
भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये नंदुरबारच्या जिल्हा परिषद माजी सदस्य व माजी भाजपा जिल्हा अध्यक्ष नागेश पाडवी, जि. प. माजी सदस्य व माजी शिवसेना जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रताप वसावे, जिल्हा परिषद माजी सदस्य नितेश वळवी, जिल्हा परिषद माजी सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषद माजी सदस्य अशोक राऊत, अभिषेक सावरीकर, काँग्रेसचे पदाधिकारी अक्षय बलकवडे, शरद पवार गटाचे युवक प्रदेश सरचिटणीस किरण मराठे, अजिंक्य गायकवाड यांचा समावेश आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा, जिल्हा परिषद माजी सदस्या सुनिता भांगरे आणि माजी आमदार यशवंत भांगरे यांचे सुपुत्र अकोले पं. स. माजी सदस्य दिलीप भांगरे, घाटघर सरपंच लक्ष्मण पोकळे, सरपंच एकनाथ सारुखे, भंडारदरा सरपंच अनिता खाडे, रतनवाडी सरपंच बाळासाहेब जडे, पेणशेतच्या माजी उपसरपंच हुंदा पद्मेरे, भंडारदरा माजी सरपंच सुमन खाडे, संजय बांडे, नंदिनी फतवे आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला.
कराड उत्तर तालुक्यातील रहिमतपूरचे नगरसेवक विक्रमसिंह माने, माजी उपनगराध्यक्ष विकास तुपे, प्रशांत भोसले, काँग्रेस सेवा दल प्रदेश सरचिटणीस उमेश साळुंखे, कल्याणराव डुबल आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला.