नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोथरूड कर्वेनगर माहेश्वरी मंडळाच्या वतीने भव्य अन्नकोट सोहळ्याचे आयोजन
 
				पुणे : कोथरूड कर्वेनगर माहेश्वरी मंडळाच्या वतीने भव्य अन्नकोट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून द्वारकाधीश श्रीकृष्णांची मनोभावे पूजा केली. यावेळी सर्वांना अन्नकोट सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यावेळी समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष विठ्ठल आण्णा बराटे, माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुतडा, तसेच हनुमान काळ्या, जितेंद्र दरक, बालाजी खाबानी, पवन भराडिया, प्रमोद जाजू यांच्यासह माहेश्वरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
			