कोथरुडकरांना आता अल्प दरात हॉल उपलब्ध होणार… नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या “श्री म्हातोबा बॅंक्वेट हॉलचे येत्या ३ नोव्हेंबर रोजी होणार लोकार्पण
 
				पुणे : कोथरुडमधील गरीब घरातील मुलींचे आनंद सोहळे अतिशय थाटामाटात साजरे व्हावेत, या उदात्त हेतूने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडचे ग्रामदैवत श्री म्हातोबाच्या आशीर्वादाने आणि लोकसहभागातून “श्री म्हातोबा बॅंक्वेट हॉल” उभारला आहे.
या बॅंक्वेट हॉलचे लोकार्पण येणाऱ्या ३ नोव्हेंबर रोजी होणार असून, या उपक्रमाची सर्वांना माहिती व्हावी म्हणून खास माहितीपट तयार करण्यात आला आहे. कोथरुडकरांच्या सोयीसाठी उभारलेल्या या सामाजिक उपक्रमाचा भाग होण्यात एक वेगळेच समाधान लाभत असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
चंद्रकांत पाटील आपल्या कोथरूड मतदारसंघातील नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. अनेकदा येथील नागरिकांनी पाटील यांना विनंती केली होती कि, कोथरूड भागात गरीब घरातील मुलामुलींचे लग्न करण्यासाठी माफक दरात एखादे कार्यालय उपलब्ध करून द्यावे जेणेकरून त्यांचे सोहळे अतिशय थाटामाटात साजरे होतील . चंद्रकांत पाटील यांनी लगेचच पुढाकार घेत गरिबांना माफक दारात एखादा हॉल उपलब्ध व्हावा यासाठी इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे कोथरूडमध्ये लोकसहभागातून सुसज्ज असा हॉल तयार करण्यात आला आहे.
 
			