भाजपा तासगाव तालुक्याच्या वतीने ‘एकता दौड’ चे आयोजन… पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकता दौड मध्ये घेतला सहभाग
सांगली : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाजपा तासगाव तालुक्याच्या वतीने आयोजित शुक्रवारी ‘एकता दौड’ राबविण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यामध्ये सहभाग घेत मार्गदर्शन केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, या दौडीच्या माध्यमातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला नवचैतन्य मिळाले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्मितीतील महान योगदानाचे स्मरण करत, देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, हा संदेश यावेळी देण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्याने हा उपक्रम राबविण्यात आला . या वॉकथॉनचे उद्दिष्ट समाजात ऐक्य, देशभक्तीचा संदेश पसरवणे हे आहे.
या प्रेरणादायी दौडीमध्ये भाजपा तासगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.