भाजपा कोथरूड मध्य मंडल उपाध्यक्ष संदीप मोरे यांच्या संयोजनातून सर्वसामान्य नागरिकांसाठी एक सामाजिक उपक्रम… नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ संपन्न
पुणे : कोथरूड येथे भाजपा कोथरूड मध्य मंडल उपाध्यक्ष संदीप मोरे यांच्या संयोजनातून सर्वसामान्य नागरिकांसाठी एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमाचा आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच काही लाभार्थ्यांना वस्तू देऊन अभिनंदन केले. यावेळी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन देखील केले.
या प्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेविका छायाताई मारणे, आशुतोष वैशंपायन, अनिता तलाठी, प्रभाग अध्यक्ष अतुल शिंदे, अजय मारणे आदी मान्यवर उपस्थित होते.