पुण्यात ‘पुणे रन फॉर युनिटी मॅरेथॉनचे आयोजन … केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री माधुरी मिसाळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फ्लॅग ऑफ करुन स्पर्धेचा केला शुभारंभ
पुणे : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड अंतर्गत आज केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आणि संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने फोर्स मोटर्स ‘पुणे रन फॉर युनिटी’ या महामॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्याला पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत पुण्याच्या एकतेचा संदेश दिला. ४ गटात झालेल्या या मॅरेथॉनमध्ये २१ हजारांहून अधिक पुणेकरांनी सहभाग नोंदवला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी फ्लॅग ऑफ करुन स्पर्धेचा शुभारंभ केला.
यावर्षी पहिल्यांदाच पुण्यात ‘पुणे रन फॉर युनिटी’चे आयोजन केले गेले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह अंदाजे २१,००० हून अधिक धावपटू सहभागी झाले. केनिया, इथिओपिया इत्यादी देशांतील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटूंनी सहभागी होत पारितोषिके पटकावली.
नागरिकांना फिटनेस, एकता आणि राष्ट्रीय सलोखा या मूल्यांभोवती एकत्र आणणारा हा उपक्रम मोठा सार्वजनिक क्रीडा सोहळा ठरला आहे. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरदार पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देशभरात ‘रन फॉर युनिटी’ (राष्ट्रीय एकता दौड) या उपक्रमाचे आयोजन केले जाते.
यावेळी आमदार भीमरावअण्णा तापकीर, आमदार हेमंतभाऊ रासने, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, ॲड. एस.के. जैन सर, क्रिकेटपटू केदार जाधव, फोर्स मोटर्सचे अध्यक्ष मकरंद कानडे, कॅप्टन अभिनील राय, विमानतळ संचालक संतोष ढोके, सीआयएसएफचे प्रताप पुंडे, राकेश मारू, प्रवीण कर्नावत, ऋषी लुहारूका, सुशील जाधव, इंद्रनील चितळे, अमूलचे प्रदीप जाधव, अमय शिरोडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.