नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आणि लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या “श्री म्हातोबा बॅंक्वेट हॉल”चे लोकार्पण संपन्न
				पुणे : पुणे कोथरुडमधील गरजू कुटुंबातील मुलींचे विवाह सोहळे सन्मानाने आणि थाटामाटात पार पडावेत, या उद्देशाने श्री म्हातोबा देवस्थान परिसरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आणि लोकसहभागातून बॅंक्वेट हॉल उभारण्यात आला आहे. सोमवारी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरुड ग्रामस्थांच्या उपस्थितीत या बॅंक्वेट हॉलचे लोकार्पण करण्यात आले.
ही सेवा श्री म्हातोबा महाराजांच्या चरणी अर्पण करत असून, कोथरुडमधील नागरिकांसाठी अशाच सामाजिक उपक्रमांची सतत सेवा करण्याची प्रेरणा लाभो, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

कोथरुडमधील गरीब घरातील मुलींचे आनंद सोहळे अतिशय थाटामाटात साजरे व्हावेत, या उदात्त हेतूने कोथरुडचे ग्रामदैवत श्री म्हातोबाच्या आशीर्वादाने नामदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून “श्री म्हातोबा बॅंक्वेट हॉल” उभारण्यात आला आहे. पहिला मजला, श्री म्हातोबा मंदिर, कोथरूड गावठाण, कोथरूड, पुणे येथे आकर्षक सजवटीचा , ६००० स्केवरफीटचा असा प्रशस्त हा हॉल आहे. वधू वरांसाठी टॉयलेट बाथरूमसह स्वतंत्र अशी रूम, सेपरेट डायनिंग हॉल, सीसीटीव्ही, स्पिकर्स, माईक – साउंड सिस्टीम हे सगळं येथे उपलब्ध आहे.