२५ वर्षांपासून प्रलंबित एकलव्य कॉलेज ते राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंक मार्गाचे नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा कोथरुड मधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मिसिंग लिंक जोडणे महत्त्वाचे असून, त्यासाठी महापालिकेत सातत्याने पाठपुरावा सुरु होता. यातील २५ वर्षांपासून प्रलंबित एकलव्य कॉलेज ते राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंक मार्गाचे काम मार्गी लागले असून, आज त्याचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या मिसिंग लिंकमुळे परिसरातील वाहतूक सुलभ होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे पाटील यांनी यावेळी म्हटले.
या प्रकल्पासाठी बांदल कुटुंबीयांनी केलेल्या सहकार्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले . मतदारसंघातील इतरही प्रलंबित मिसिंग लिंक लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास या प्रसंगी पाटील यांनी व्यक्त केला.
या लोकार्पण सोहळ्याला महापालिकेच्या पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, जागा मालक बांदल कुटुंबीय, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील, माजी नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभूणे-पाठक, अल्पना वरपे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश वरपे, जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, विद्या टेमकर, गिरीश भेलके, वैभव मुरकुटे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.