उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी दिली सदिच्छ भेट
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी पुणे आणि पिंपरी चंचवड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी त्यांनी यावेळी सदिच्छ भेट दिली. प्रत्येक ठिकाणी पाटील यांचे आत्मीयतेने स्वागत करण्यात आले.
चंद्र्कांत पाटील यांनी माजी नगरसेवक संदीप कसपटे, चिंचवड गावातील करुणा चिंचवडे आणि वाल्हेकर वाडीतील शामराव वेल्हेकर, भाजपा नेते विनायक गायकवाड आणि काळुराम बारणे आणि भाजपा पिंपरी-चिंचवड युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मंगेश नढे यांच्या काळेवाडी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
या प्रसंगी शंकरभाऊ जगताप, शत्रुघ्न काटे, सदाशिव खाडे, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, दिनेश यादव, अजित कुलफे, विनोद नढे, निताताई पाडाळे, विनोद तापकीर, काळुराम नढे तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटीत स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांशी पाटील यांनी आपुलकीचा संवाद साधला तसेच मार्गदर्शन देखील केले. सर्व कुटुंबियांनी दाखविलेल्या आत्मीय स्वागत, स्नेह आणि प्रेमाबद्दल पाटील यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.