माजी नगरसेवक दिलीप आण्णा वेडे पाटील यांच्या संयोजनातून कोथरूड-बावधन मॅरेथॉनचे आयोजन… मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून मॅरॅथॉनचा शुभारंभ
पुणे : कोथरूड येथे माजी नगरसेवक दिलीप आण्णा वेडे पाटील यांच्या संयोजनातून कोथरूड-बावधन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनचा शुभारंभ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून करण्यात आला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘फिट इंडिया’ या संकल्पनेला प्रेरणा मानून ही मॅरेथॉन आरोग्यदायी जीवनशैलीचा उत्सव आणि सामूहिक एकतेचा संदेश देणारा उपक्रम ठरला आहे. यावेळी तरुणाईला सक्रिय, तंदुरुस्त आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
या मॅरेथॉनमध्ये पुणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण या मॅरॅथॉनमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.