मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुस्तीच्या आखाड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सनी फुलमाळीची भेट घेऊन त्याचे स्वीकारले पालकत्व
लोहगाव,पुणे : आज पुणे येथील लोहगावच्या पालावर राहून कुस्तीच्या आखाड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सनी फुलमाळी या खेळाडूची आणि त्याच्या कुटुंबाची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन अभिनंदन केले.
सनी फुलमाळी याच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत, सनी फुलमाळीचे पालकत्व स्वीकारले असून, लोकसहभागातून घर, सरावासाठी तालीम, शिक्षणासाठी मदत तसेच स्वतःच्या पगारातून दरमहा ₹५०,००० देण्याची घोषणा यावेळी पाटील यांनी केली. तसेच,सनीने शिक्षणासोबतच कुस्तीकडे लक्ष केंद्रीत करून ऑलिम्पिकमध्येही सुवर्ण पदक जिंकावे, हीच शुभेच्छा पाटील यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी सनीचे प्रशिक्षक वस्ताद सदाशिव राखपसरे, भाजपा क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे, माजी नगरसेवक बॅाबी टिंगरे, तसेच भागातील नागरिक आणि पालावरील बांधव उपस्थित होते.