उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑल आर्टिस्ट फाऊंडेशनच्या ५व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
पुणे : पुणे येथे ऑल आर्टिस्ट फाऊंडेशनच्या ५व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज उपस्थित राहून संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, मी कलाकारांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहिलो असून, गणेशोत्सव काळात कोथरुडमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे अनेक नवोदित कलाकारांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली. फाऊंडेशनचे कार्य अधिक वृद्धिंगत होऊन कलाक्षेत्रात नवचैतन्य निर्माण होवो, हीच शुभेच्छा पाटील यांनी दिली.
कलेतील विविध घटकांसाठी सदैव तत्पर असलेली आणि कलारसिकांसाठी आपुलकीचे व्यासपीठ निर्माण करणारी “ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र” ही हक्काची संस्था आहे. ‘ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन’ ही संस्था लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, बॅक स्टेज कलावंत, नाटक, एकपात्री आणि चित्रपट अशा विविध कला घटकांसाठी कार्यरत आहे. यावेळी ज्येष्ठ कलावंताना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून आणि युवा कलावंताना प्रेरणा देण्यासाठी आम्ही ‘कलाभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या एकदिवसीय सांस्कृतिक महोत्सवात विविध कलाप्रकारांची अप्रतिम मेजवानी अनुभवता आली.
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर, सुनील महाजन तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.