केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संयोजनातून ‘खासदार चषक’ स्पर्धांचे आयोजन… कर्वेनगर येथे आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेच्या स्थळास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट
पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्व खासदारांसाठी क्रीडा महोत्सव आयोजित करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्या उपक्रमाच्या अंतर्गत पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संयोजनातून ‘खासदार चषक’ स्पर्धांचे आयोजन पुणे शहरात करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कर्वेनगर येथे आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेच्या स्थळास भेट देऊन सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील म्हणाले, या स्पर्धांच्या माध्यमातून खेळ, आरोग्य आणि लोकसहभाग या तिन्ही क्षेत्रांना चालना मिळत आहे. नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेअंतर्गत सुरू झालेल्या पुण्यातील खासदार क्रीडा महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.
या प्रसंगी राष्ट्रीय पंच कुलदीप कोंडे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस सुशील मेंगडे, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, डॉ. संदीप बुटाला, शिवरामपंत मेंगडे, नितीन शिंदे, वृषाली चौधरी, मनीषा बुटाला, दत्ताभाऊ चौधरी, संतोष बराटे, कुणाल तोंडे, राजीव मोरे तसेच भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.